2024 मध्ये भाजपा येणार हा भ्रम असून जनताच निर्णायक ठरणार !!!!
मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार ने गेली दहा वर्ष सत्ता केली पण समाधानी कोणीही नाही असे मला वाटते अजून लोकाना पंधरा लाख दिले नाहीत. 370 कलम काश्मीर राज्यातील रद्द करण्यात आले पण अद्याप तेथील परिस्थिती बदलली नाही तिथे जाऊन तिथेच स्थायिक झालेल्या लोकाना अध्याप रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. काश्मीर ब्राह्मण यांची वाताहात झाली होती ती अजून तशीच आहे तरी माझी एक विनंती आहे की आपण प्रथम त्यांची संख्या जास्त कशी करायची याचा विचार केला तर नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता तयार करून पाक ने हडप केलेला प्रांत घेऊन आपल्या पक्षाची ताकद दाखवून दिली तर बरे होईल असे मला वाटते. इतर पक्षांना Ed दाखवून व आपण कसे श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे असे सांगणे म्हणजे स्वतः बदल अधिक आत्मविश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटते. स्वतःशी प्रामाणिक राहून प्रसिद्ध न घेता लोकांची सेवा करून भारताची जगात प्रतिमा निर्माण करण्याची जबाबदारी घेतली तर नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करू शकतो व भारत हा विश्व गुरू होऊ शकतो असे मला वाटते. त्यासाठीच बलिदान, शौर्य,त्याग, देशभक्तीची, देशप्रेम या संकल्पना प्राधान्य देण्यात आले तर समाजात सकारात्मकता निर्माण होईल अधिक सकारात्मक विचार केला तर ते मोदी सरकारने केले तर लोकांच्या मनात मोदी यांच्या वर विश्वास ठेवून पाठिंबा मिळेल त्या साठी GST कसा कमी करता येईल व महागाईच्या जमान्यात लोकाना आपण काय देणार आहोत याचा अजेंडा प्रथम देणे गरजेचे आहे तरच economically भारत प्रगती करेलच असे मला वाटते. देशाची आर्थिक स्थिती चांगली कामगिरी करण्यासाठी संपर्क,सहयोग, संस्कर,सेवा, व शेवटी समर्पणाची भावना ही फार महत्त्वाची भूमिका बजावणे हे मोदी सरकारची जबाबदारी आहे. आपण येणार हा एक भ्रमात राहू नये कारण मन जेव्हा अहंकारात राहते तेव्हा तुम्हाला दुसर्याची पर्वा नसते हे उमजले तर नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करू शकता. तुम्ही फक्त स्वतः बदल विचार करता सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा या भोवती च तुमचे मन पिंगा घालत राहते ते यशाला मारक ठरेल असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत जनजागृती केली व सर्वांना पंधरा लाख रुपयांची तरतूद, मदत केली व GST कमी करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असेल अखंड भारत संकल्पना राबविणे आवश्यक आहे नुसते बोलून दाखविला असे न होता करून दाखवणे गरजेचे आहे. समान नागरी कायदा राबविणे आवश्यक आहे असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत लोकांना लाभ होईल असे ज्येष्ठांचा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी उपक्रम राबविणे आवश्यक आहे. आपणास जनतेने दहा वर्षे दिली आता अजून पाच वर्षे हवीत मग वरीलप्रमाणे कामे पूर्ण करून देण्यात आली तर बरे होईल असे मला वाटते.
प्रसाद तुळशीराम मांजरेकर. पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नेरूळ नवी मुंबई.
Prasadmarathonrunner@gmail.com
मोबाईल 9819180879.
Comments
Post a Comment