Posts

Showing posts from November, 2023

क्रिकेटपटू बेसावध असताना हरणे निश्चित होते!!!!

भारतासमोर आवाहन असताना ही तो बेसावधपणे सामोरा जातो अणि हरतो व आपल्या च पायावरच दगड मरत आहे असेच चित्र पाहावयास मिळाले आहे.  ऑस्ट्रेलिया संघाने तर प्रतेक खेळाडूच्या कमतरतेचा अभ्यास केला तर भारत हा बेभरवशाचा खेळ करणारा देश आहे हे मानसशास्त्र उमजले तर नक्की आपण आपल्या भावना समजायला मदत होईल असे मला वाटते. ऑस्ट्रियन खेळाडू हे अभ्यासू आहेत त्याची प्रचिती प्रतेक खेळाडू मध्ये दिसून येत होती तर आपल्या संघाने नामुष्की पत्करावी लागली याला कारणीभूत आहेत फक्त तीन फलंदाज व फक्त एक गोलंदाज असताना सामना वानखेडे स्टेडियमवर का नाही ठेवला?? गुजरात मध्ये सामना ठेवता व खेळपट्टी कशी बनवायची हे ही माहित नाही ही एकप्रकारे शोकांतिकाच आहे. असे असताना आपण कुठली अपेक्षा ठेवता येईल हे अपेक्षा भंग केला आहे असे मला वाटते. ऑस्ट्रियन क्रिकेटपटू संघांनी तर चक्क विश्वचषक वर स्वतःशी तंगडी ठेवली होती ही एकप्रकारची भारताची शोकांतिकाच आहे असे मला वाटते.  तरी तळागाळापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे पराभवाचा धक्का सर्व भारतीयांना बसला आहे. तरी माझी एक विनंती आहे की आपण हा सामना वानखेडे स्टेडियमवर वर भर...

WNC NAVY मॅराथॉन तरुणांचा सहभाग सोळा हजारांचा!!!!!

इंडियन ऑईल पुरस्कृत अशी ही आशियात मोठी मॅराथॉन WNC NAVY मॅराथॉन आज 19th नोव्हेंबर 2023 आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आली होती त्या मध्ये सोळा हजार तरुण व तरुणीने उपस्थिती दर्शवली हे या मॅराथॉन प्रमुख वैशिष्टय़े आहे. तरुणांना व जेष्ठ नागरिकांना अधिक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या स्पर्धेत सहभागी झाले होते जेणेकरून आपली आरोग्य अधिक चांगले राहील असा विचार करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मी ही या वयात मॅराथॉन मध्ये सहभागी झालो होतो ही माझी दोनशे व्ही मॅराथॉन असावी मी एप्रिल 1999 पासून मॅराथॉन सुरवात केली ती रायगड परिक्रमा ही पंधरा किलोमीटर कठीण व अवघड मॅराथॉन होती. मी बेचाळीस किलोमीटर मॅराथॉन 14th जानेवारी 2014 मुंबई स्टँडर्ड चार्टर्ड मॅराथॉन पूर्ण केली. एकवीस किलोमीटर चा दहा ते पंधरा मी पूर्ण केला आहेत. अजून मी तीस वर्षे मॅराथॉन मध्ये सहभागी होणार आहे. शारीरिक तंदुरुस्ती साठी प्रत्येकानी मॅराथॉन मध्ये सहभागी होणे आवश्यक आहे असे मला वाटते हा एक उत्सव साजरा करणाऱ्यांना आनंदाची पर्वणीच असते तरी प्रत्येकानी nevy व टाटा मॅराथॉन सहभागी व्हावे असे माल वाटते.  प्रसाद तुळशीराम मांजरेकर....