टोल वसुली करून मंत्री श्रीमंत लोक कंगाल!!!!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या टोल फ्री करा अन्यथा ती जाळून टाकू हे विधान मला तरी पटते आहे. अगोदरच तुम्ही भारतात प्रथम मोटार वाहन टॅक्स घेता हा पैसा जातो कुठे?? हा प्रश्न प्रथम सरकारला विचारावा लागेल असे मला तरी वाटते तरी महाराष्ट्रात प्रगतिशील राज्य असताना टोल चा पैसा कुठे खर्च केला जातो आहे ते सांगणे आवश्यक आहे. मागे अण्णा हजारे यांनी ही आंदोलन केले होते तरी सरसकट टोल फ्री करावा असे मला वाटते कारण हा एक प्रकारचा मोठा भ्रष्टाचार हा शिष्टाचार होताना दिसत आहे. तरी मोदी सरकारने ताबडतोब बंदी घालण्यात आली तर हे सरकार टिकेल नाही तर नक्की ते गडगडले असे माल वाटते. टोल वसुली ही एकप्रकारे भिक मागत आहेत असेच चित्र निर्माण झाले आहे तरी सरकारने संपूर्ण राज्यात टोल फ्री करावी अशी आशा करतो की आपणास इतरही सोर्स असताना लोकांकडून भिक मागत श्रीमंती भोगणे ही एकप्रकारे शोकांतिकाच आहे असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करू शकतो असे मला वाटते तरी महाराष्ट्रात शासनाने सहनशीलता दाखवून देत सरसकटपणे टोल वसुली बंध करणे आवश्यक आहे असे मला वाटते. प्रसाद तुळशीराम मांजरेकर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते. नेरूळ नवी मुंबई. 
मोबाईल 9819180879. 

Comments

Popular posts from this blog

मराठी भाषा ही जागतिक ग्लोबल भाषा!!!!!

प्रतेक पोलिस स्टेशनमध्ये जेष्ठ नागरिकां साठी वेगळा कक्ष सुरू करण्यात यावा!!!!!