जीवन सुंदर आहे जगायला शिकायच !!!!

ज्येष्ठांचा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे पण अध्याप कोणीही ते सोडविण्यासाठी प्रयत्न करीत नाही ही वस्तुस्थिती आहे. सामाजिक संस्था अणि सरकार दरबारी कोणीही काहीही करीत नाही तरी सरकारने तातडीने कामे करावीत असे माल वाटते. आपण आपल्या मनःशांतीसाठी आपल्या पद्धतीने कामे करावीत व आपल्या पद्धतीने जगायला शिकणे अपरिहार्य आहे असे मला वाटते. 
कुठे व्यक्त होऊन समजून घेतले तर आयुष्य "भावगीत "आहे. किती ताणाय चे अणि कधी नरमाईचे हे उमजले तर आयुष्य "निसर्ग "आहे. 
किती आटवावे अणि काय विसरायचे हे जमले तर आयुष्य हे "इंद्रधनुष्य "आहे. किती हसावे अणि केव्हा हसायचे हे ओळखले तर आयुष्य "नंदनवन "आहे.
यशस्वी भरपूर जण असतात पण समाधानी फार कमी असतात. स्वताचे अस्तित्व निर्माण करण्याची क्षमता ही काष्ट,मेहनत, संकटे याचे भान रहात नाही. आयुष्यातील काही शन हे एकांतात घालावीत तिथेच खरा संवाद स्वतःशीच होताना दिसत असतो. भावना समजायला साथ ही लागतेच त्याप्रमाणेच मन जुळवून यायला हृदयाची हाक लागतेच. 
0संपत्ती अणि स्थिती ही तात्पुरती मोठी बनवते तर "माणुसकी "अणि "नैतिकता "माणसाला नेहमीच आदर्श बनवत असते. जगण्यातले सर्वात कणखर आव्हान म्हणजेच मनाला लावून न घेणे हे मानसशास्त्र उमजले तर आयुष्य फार सुंदर आहे. याच साठी दोन गोष्टी कधीच संपणार नाहीत मनाचा "बालपण "अणि अंतःकरणातील "देवपण "
प्रसाद तुळशीराम मांजरेकर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नेरूळ नवी मुंबई. मोबाईल 9819180879 नमस्कार 

Comments

Popular posts from this blog

मराठी भाषा ही जागतिक ग्लोबल भाषा!!!!!

प्रतेक पोलिस स्टेशनमध्ये जेष्ठ नागरिकां साठी वेगळा कक्ष सुरू करण्यात यावा!!!!!

टोल वसुली करून मंत्री श्रीमंत लोक कंगाल!!!!