महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण जास्त!!!!!
महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे याला कारण म्हणजे गरिबी आणि रोजगाराच्या शोधात असताना मोठी फसवणूक होताना दिसते. समाजात महिलांना कमी दर्जा प्राप्त होताना दिसत आहे. महिला हे एक आर्थिक नुकसान असे समजून घरातीलच लोक तिची ससेहोलपट करीत असतात आणि वेळ प्रसंगी तिची पैशासाठी विकली जाते कित्येक मुली मसाज सेंटर, बिअर बार, कॉल सेंटर वर कामे करताना दिसतात असे असेल तर महिला पाच वर्षात चौदा लाख बेपत्ता झाले हे सरकारचे अपयश आहे तरी सरकारने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आले तर बरे होईल असे मला वाटते.आर्थिक परिस्थिती चांगली नसते अशा वेळी अनेक पालक पैशासाठी सौदा करताना दिसतात तसेच मूलही पैशासाठी पळून जाताना दिसतात जेणेकरून कुटुंबावर व समाजावर ओझे कमी होईल आणि आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटका होईल ही तीव्र भावना असते तरी महाराष्ट्र शासनाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिले तर याला नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. महिलांना त्यांच्या घरी जर त्रास होत असेल तर त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी टास्क फोर्स असावा असे मला वाटते जेणेकरून महिलांना सुरक्षितता मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे मला वाटते. स्त्री ही टाकाऊ, विकाऊ नसून ती एक आई, बहीण व राष्ट्राची संपत्ती असून असे कायदे बनवून संरक्षण करणे हे काम सरकारचे आहे. लहान मोटे उद्योगात महिलांसाठी राखीव जागा ठेऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा.
प्रसाद तुळशीराम मांजरेकर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते. नेरूळ नवी मुंबई मोबाईल 9819180879.
Comments
Post a Comment