खड्डे की भ्रष्टाचार चे अड्डे!!!!
पावसाळा सुरू झाला की रस्ता आहे की रस्तावर खाडय़ा निर्माण होताना दिसतात. काही ठिकाणी तर पाणी नेहमीच तुंबलेल्या असते मी हे सर्व पन्नास वर्षे पाहत आहे तरी आत्ता या साठी सदस्याचे आणि कमिटी नेमून प्रतेक विभागात,जिल्ह्यात, राज्य शासनाने जाहीर करण्यात आलेल्या अजेंडा प्रमाणे कामे पूर्ण केली आहेत का? नसतील तर कारवाईचा बडगा उगारला तर बरे होईल असे मला वाटते. जे मटेरियल वापरतात त्याची माहिती देण्यात आली तर बरे होईल असे मला वाटते. विरोधीपक्ष यांनी अधिक माहितीसाठी चहा पाणी वर बहिष्कार टाकला तर बरे होईल असे मला वाटते. नागपूर जिल्ह्य़ात रस्ते उत्तम असतात तर मुंबईत असे का होते याची सकल चौकशी करावी लागेल आणि त्यासाठी आवश्यक ते बदल करून ठेकेदाराला 30% रकमेची व बँक गॅरंटी असेल तरच कामे देण्यात यावी. नाहीतर मग ब्लॅक लिस्ट मध्ये नावे जाहीर करून वाळीत टाकणे हे उत्तम समन्वय रहावा म्हणून हे तातडीने राबविण्यात आले तर बरे होईल असे मला वाटते. नगरसेवक, आमदार, खासदारांना जबाबदार्या देईनच कामे पूर्ण करण्यात यावीत यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मला वाटते. आयुक्त हे आयएएस अधिकारी असून असे प्रकार घडतात हे भारत देशातील नागरिकांची शोकांतिका आहे. महात्मा फुले हे ही पुण्याचे आयुक्त होते त्यांच्या सारखी कामे पूर्ण केली तर भारत देश नक्की प्रगती करेल पण अशी कामे होताना दिसत नाही याला कारणीभूत " खंडणी खोर अधिकारी व कर्मचारी सरकार आहेत "
प्रसाद तुळशीराम namaste पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते. नेरूळ नवी मुंबई मोबाईल 9819180879.
Comments
Post a Comment